मोडनिंब : जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या युनिट नं. २ करकंब कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी झाली. या तपासणीत सर्व ऊसवजनकाटे योग्य व अचूक असल्याचे आढळून आले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ३ फेब्रुवारी रोजी पंढरपूरचे तहसीलदार विवेक साळुंखे,वैधमापक निरीक्षक एस.एस.नाईक, वैधमापन शास्त्र निरीक्षक एस.व्ही.यादव, लेखा परिक्षक पी.आर.शिंदे, पोलीस हवालदार अरुण राजकर, ऊस उत्पादक धनाजी लांडे, दत्तात्रय भोसले यांच्या भरारी पथकाने अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या युनिट नंबर दोनच्या वजनकाट्याची तपासणी केली. यावेळी वजन तपासले असता कारखान्याच्या वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. भरारी पथकाने पंचनामा करून ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसल्याचा अहवालात दिला.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक एस.आर.यादव, चीफ इंजिनिअर एन.एच. नायकोडे, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, पर्यवेक्षक ए.ए.काळे, क्लार्क एस.एच.मिसकर उपस्थित होते.