चपळगाव परिसरात हुरडा पार्टी झडू लागल्या
चपळगाव- यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने ज्वारीचे उत्पादन मुबलक होत आहे. सध्या चपळगाव परिसरात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात असून हुर्डा पार्टी झडू लागल्या आहेत. सुटी काढून अनेक कुटुंब शेतामध्ये दाखल होताहेत. काही शेतकऱ्यांनी पीकनिक सेंटर सुरू केले आहे.
जल्लोषानंतर आता सरपंच निवडीकडे लक्ष
चपळगाव : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चपळगाव, हन्नूर, कुरनूर, चपळगाववाडी, डोंबरजवळगे या गावांमध्ये पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. आता सरपंच निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. आता तालुक्यात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे.
उडगी-कडबगाव नवीन रस्ता अर्धवट अवस्थेत
उडगी: अक्कलकोट तालुक्यातील उडगी-कडबगाव हा पाच कि.मी. रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत राहिलेला आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. काटेरी झाडेझुडपेही वाढलेली आहेत. त्यामुळे समोरचा रस्ता दिसत नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागते, त्यामुळे नवीन रस्ता कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनधारकांतून होत आहे.