कोरफळे (ता. बार्शी) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा आरोप केला.
सरकार व विमा कंपन्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा न करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करून कोरोनाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप त्यांनी केला. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची व विमा भरपाई जमा न झाल्यास नाइलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा गायकवाड यांनी दिला.
यावेळी बार्शी तालुका वकील आघाडीचे प्रमुख ॲड. इकबाल पठाण, सौरभ यादव, नाना तिकटे, प्रवीण घेमाड, विठ्ठल तिकटे, सुरज वांगदरे, रणजित माने, सुरज चौधरी, अमोल जगताप, धनाजी बरडे, अर्जुन तिकटे, संतोष गोरे, मारुती टोणगे, बालाजी घेमाड, सुरज शिंदे, सागर जगताप, बालाजी तिकटे, शंकर पाटील, रामानंद मुटकुळे, पांडुरंग वांगदरे, नागनाथ टोणगे, एकनाथ राऊत आदींसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घोडके यांनी तर आभार रणजित बरडे यांनी यांनी मानले.
१५बार्शी-आंदोलन
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड.