शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

सोलापूर शहरातील लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री; शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:44 AM

सोलापूर : शहरातील घंटागाड्यांचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. कचरा संकलनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री ...

ठळक मुद्देसध्या महापालिकेकडे २२५ घंटागाड्या आहेत. तरीही शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसतोयकचरा संकलनासाठी ५०० छोट्या आणि मोठ्या लोखंडी कचराकुंड्या ठेवल्या होत्याकचरा संकलनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर : शहरातील घंटागाड्यांचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. कचरा संकलनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला. 

घनकचरा व्यवस्थापन आणि घंटागाड्यांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षकार्यालयात नगरसेवक देवेंद्र कोठे, राजकुमार हंचाटे, विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, भारतसिंग बडुरवाले, प्रथमेश कोठे, रामदास मगर यांनी मुख्य सफाई अधीक्षक संतोष जोगधनकर, बी.पी. भूमकर, गिरीश तंबाके, मिटकॉनचे भाऊसाहेब तंबाके यांच्यासमवेत बैठक घेतली.

बैठकीनंतर नगरसेवक हंचाटे म्हणाले, यापूर्वी समीक्षा कंपनीकडे कचरा संकलनाचे काम होते तेव्हा ५१ घंटागाड्या, सहा ते आठ आरसी गाड्या, सहा डंपर होते. तरीही शहरातील कचरा बºयापैकी उचलला जात होता. सध्या महापालिकेकडे २२५ घंटागाड्या आहेत. तरीही शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसतोय. कचरा संकलनासाठी ५०० छोट्या आणि मोठ्या लोखंडी कचराकुंड्या ठेवल्या होत्या.

घंटागाड्या सुरू झाल्यानंतर या लोखंडी कचराकुंड्या हटविण्याचे काम सुरू झाले. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजार परिसर आणि वर्दळीच्या भागात अद्यापही ५० कचराकुंड्या आहेत. तर ४५० कचराकुंड्या जुळे सोलापुरातील पाण्याची टाकी आणि कुमठा नाका येथील महापालिकेच्या जागेवर ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी या जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा अनेक कंटेनर गायब असल्याचे दिसून आले. या कंटेनरची विक्री झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही हंचाटे यांनी केली. 

डस्टबीन वाटपात अनियमितता- स्मार्ट सिटी योजनेतून १ लाख डस्टबीन खरेदी करण्यात आले. त्यातील ९९ हजार ४८६ डस्टबीन आठ झोनमध्ये वाटप करण्यात आले. त्यातही काही प्रभागात जास्त तर काही प्रभागात कमी डस्टबीन वाटप करण्यात आल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला. शहरात उघड्यावर कचरा टाकणाºयांना दंड होतो. तसाच तो वेळेवर कचरा न उचलणाºया अधिकाºयांना व्हावा, अशी मागणी गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका