शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

काँग्रेसमधील अंतर्गत  वाद चव्हाट्यावर, नाना पटोलेंवर सोलापुरातील पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:50 IST

नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसचे वाटोळे केले, असा आरोप या पदाधिकाऱ्याने केला आहे.

Solapur Congress: गुजरातमध्ये भाजपसोबत काम करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत युती केली आहे. या नेत्यांचे काय करणार, असा सवाल काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपस्थित केला.

काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस भवनात पक्ष बांधणीसाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सातलिंग शटगार, जगुलकिशोर तिवाडी, गुरुनाथ म्हेत्रे, अर्जुन पाटील, अशोक देवकते, मोतीराम चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्षा शाहिन शेख, प्रा.  सिद्राम सलवदे, आदित्य फत्तेपूरकर आदी उपस्थित होते. सलवदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले. माध्यमांतून या युतीबद्दल माहिती मिळत आहे. आम्हाला लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी केला.

पटोलेंनी वाटोळे केले : पवारनंदकुमार पवार म्हणाले, नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसचे वाटोळे केले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. लवकरात लवकर नियुक्ती व्हावी.

आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, जे लोक पक्षाचे सदस्य नाहीत त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली. यातून कार्यकर्त्यांनी काय धडा घ्यायचा. सांगोल्याचे अभिषेक कांबळे म्हणाले, पक्षाने विधानसभा निवडणुकीत १५ हजार रुपयांचा निधी घेतला. हा निधी देणाऱ्यांना उमेदवारी देण्याचे प्राधान्य होते. उलट दुसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. आता हे १५ हजार रुपये परत करा. हत्तुरे म्हणाले, पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत. यातून पक्ष कसा वाढणार. दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवू, असे निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले.

पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांनी मंगळवारी शहरातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी संघटनात्मक कामांचा आढावा सादर केला. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, विनोद भोसले, मा. नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, भारती ईप्पलपल्ली, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, वाहिद विजापुरे, नजीब शेख, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसSolapurसोलापूर