सोलापूर : आगामी विश्वचषक स्पर्धा, क्रिकेट विश्वातील घडामोडी व सध्याच्या टिममधील एकूणच वातावरण यावर आधारित प्रश्नांवर भारतीय वन डे क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याच्याशी लोकमतच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.
प्रश्न : आगामी विश्वचषकाबद्दल काय सांगाल ?प्रश्न : सहा महिन्यावर विश्वचषक स्पर्धा येऊन ठेपली आहे़ एप्रिल किंवा मे महिन्यात त्याची घोषणा होईल़ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी फिटनेसवर अधिक लक्ष्य केंद्रीत केले आहे़ मीही एकदिवसीय संघाचा हिस्सा असल्याने आपली संपूर्ण तयारी झाली आहे.
प्रश्न : टी १० क्रिकेट स्पर्धा योग्य की अयोग्य ?उत्तर : टी १० क्रिकेट स्पर्धेबद्दल मी फक्त ऐकले आहे़ त्याबद्दल मला काहीच माहिती नाही़ माहिती मिळाल्यास जरूर सांगेन.
प्रश्न : विश्वचषकातील भारतीय संघातील खेळाडूंबाबत काय सांगाल ?उत्तर : भारतीय क्रिकेट संघाने नेहमीच सर्र्वाेच्च कामगिरी केली आहे़ आगामी विश्वचषकात भारताची कामिगिरी नक्कीच सरस ठरणार आहे़ भारत विश्वचषक स्पर्धा जिंकेल असा विश्वास मला आहे़ त्यादृष्टीने आमचे प्रयत्न, सराव सुरू आहे.
प्रश्न : विश्वचषकात कर्णधारपदाची धुरा कुणाकडे असेल ?उत्तर : एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीकडेच नेतृत्व असते़ त्याच पध्दतीने विश्वचषकातही तोच नेतृत्व करेल़ जेव्हा विराट कोहली नसतो तेव्हा रोहित शर्माकडे नेतृत्व येते़ क्रिकेटमध्ये कोणताही प्रांतवाद नाही.
प्रश्न : भारतीय संघातील तुझ्या प्रवेशाविषयी काय सांगशील ?उत्तर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी हे माझे आजोळ आहे़ लहानपणापासून २००५-०६ सालापर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीत मी शेतात वगैरे क्रिकेट खेळत होतो़ त्यानंतर मुंबई येथे गेल्यानंतर सहा वर्षानंतर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली़ प्