सोलापूर : अक्कलकोट तालुक्यामध्ये गरीब शेतकऱ्यांना कृषि विभागांमार्फत देण्यात येणारे विविध योजना अंतर्गत कंपार्टमेंट बंर्डिग कामे, नाला सरळीकरण, विहीरी, शेततळे असे अनेक कृषि विभागातून झालेल्या कामामध्ये बेकायदेशीर व बोगस कागदपत्रे दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे व काही ठिकाणी काही ही कामे न करता बोगस बिले ठेकेदार व विभागातील सहकारी यांच्या संगनमताने २० ते २५ कोटी रुपये भ्रष्टाचार झाल्याचे निर्दशनास आल्याचे तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरच्या कृषि योजना तालुक्यातील प्रत्येक गावात निकृष्ट दर्जाची बोगस कामे करुन लोकप्रतिनीधींच्या सहकार्याने बोगस बीले उचलली आहे.तसेच अक्कलकोट तालुक्यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायती मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे.बहुसंख्य गावात शौचालय न बांधता परस्पर रक्कम हडप करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी व लोकप्रतिनीधी मिळून बहुतेक ठिकाणी बोगस बिले उचलल्याचे निर्दशनास येत आहे. तरी संबधित ठेकेदार व कृषि सहाय्यक व संबंधित अधिकारी यांची जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख संजय देशमुख तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यासाठी तहसीलदार गटविकास अधिकारी व तालुका क्रुषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी वर योग्य कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी केले आहे.
यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, सुर्यकांत कडबगाकर, सैपन पटेल, मल्लू सराटे, प्रविण घाडगे, योगेश पवार खंडु कलाल आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने कृषि मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व कृषि कार्यालयाकडे करण्यात आली आहे.