पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या आषाढी एकादशीची मानाची शासकीय पुजा करण्याबाबतते निमंत्रण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
आषाढ शुध्द देवशयनी एकादशी दिवशी म्हणजेच १ जुलै २०२० रोजी आषाढ एकादशी सोहळा होणार आहे. आषाढ शुध्द देवशयनी एकादशी दिवशी पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची देवतांची शासकीय महापुजा मुख्यमंत्री व मानाच्या वारकºयांच्या हस्ते सपत्नीक आयोजीत केले जाते.
तरी या वर्षी शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यासासाठी निमंत्रण देण्याबाबत २ जून २०२० रोजीच्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ११ जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा सपत्नीक करण्याबाबतचे निमंत्रण पत्र मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ई-मेल द्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.