सोलापूर : सोलापुरात प्रथमच रणजी संघाचा सराव सोमवार ११ सप्टेंबर २०२३ पासून इंदिरा गांधी स्टेडीयम (पार्क मैदान) येथे प्रथमच महाराष्ट्र रणजी क्रिकेट खेळाडूचा सराव शिबीर पाच दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत असणार आहे. हा मान सोलापूरला प्रथमच मिळत आहे.
या शिबिरात भारतीय आयपील तसेच रणजी क्रिकेट खेळाडूचा समावेश असणार आहे. दरम्यान, सोलापुरात होत असलेल्या रणजी सराव शिबीरासाठी केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, (भारतीय खेळाडू ), अंकित बावणे, निखिल नाईक, विकी ओसवाल, प्रशांत सोळंकी, हांगेरीकर (सर्व आयपीएल खेळाडू ) महत्वाचे म्हणजे आपल्या सोलापूरचा अर्शिंन कुलकर्णी हाही असणार आहे.
राज्य निवड समितीचे सदस्य सोलापूरचा माजी रणजी खेळाडू रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडणार आहे. हे शिबीर पार पाडण्यासाठी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी चंद्रकांत रेंबूर्सू , प्रकाश भुतडा, संतोष बडवे, शिवा अकलूजकर, राजेंद्र गोटे सर संघटनेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सभासद परिश्रम घेत आहेत. सोलापूरकरांना सराव स्टेडीयम वरून पाहण्यास सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत मिळणार आहे.