शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

धान्य वाटपात अनियमितता; माढा, करमाळ्यातील दुकानदारांचे परवाने रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:36 AM

ज्यादा दराने धान्य वाटप; स्वस्त धान्य दुकानदारांबाबतच्या तक्रारी वाढल्या

ठळक मुद्दे- करमाळा,माढ्यातील रेशन दुकानदारांबाबत तक्रारी वाढल्या- लॉकडाऊन काळात जास्त पैसे घेऊन दिले जाते धान्य- सर्वसामान्य नागरिक संतप्त, महसुल यंत्रणा अलर्ट

माढा/करमाळा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊच्या काळात स्वस्त धान्य दुकानदार आपली भूमिका व्यवस्थित राबवत नसल्याचे लक्षात पुरवठा विभागाच्या लक्षात येत आहे. यावर कठोर पावले उचलली जात आहेत. माढा तालुक्यातील पिंपळनेर दोन आणि करमाळा तालुक्यातील कुगाव येथील एक अशा तीन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

माढा तालुक्यातील दोन स्वस्त धान्य दुकानात अनियमितता दिसून येताच एक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला तर दुसरा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.

माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील पी़ एस़ लोकरे स्वस्त धान्य दुकान व गंगामाई महिला बचत गट या दोन स्वस्त धान्य दुकानाबाबत धान्य वाटपाच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या़  या दुकानांची तपासणी करण्यात आली़ चौकशीअंती या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आला होता़ या दुकानाबाबत धान्य वाटपातील अनियमितता व योजनेतील पात्र लाभार्थी व्यतिरिक्त इतर शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने गंगामाई महिला बचत गट (पिंपळनेर) या दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला़ तसेच पी. एस. लोकरे या दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांनी दिला आहे.

अन्यथा अन्नसुरक्षा अधिनियमान्वये कारवाई- माढा तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार यांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित व विनातक्रार धान्याचे वाटप करावे अशा सूचना होत्या़ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही  रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या तक्रारी येणार नाहीत व पात्र लाभार्थी अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित रास्त भाव धान्य दुकानदाराविरुद्ध राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश माढा  तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिला आहे.

लॉकडाऊन काळात जास्त पैसे घेऊन दिले धान्यलॉकडाऊनच्या काळात जास्त पैसे घेऊन कमी धान्याचे वाटप केल्याप्रकरणी तहसीलदार समीर माने यांनी कुगाव (ता.करमाळा) येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला़ याबरोबरच सोमवारी दुकान सील करण्यात आले.  कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे़ या कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. करमाळा तालुक्यात कुगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून जास्तीचे पैसे घेऊन कमी माल देत असल्याची तक्रार दोघा शिधापत्रिकाधारकांनी केली होती़ त्यावरून तहसीलदार समीर माने यांनी चौकशी करून नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडलाधिकारी रेवन्नाथ वळेकर यांना कुगाव येथे पाठवून सोमवारी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला़ तसेच दुकानास सील ठोक ठोकले आहे. हा परवाना रद्द केल्याने आता कुगावचे स्वस्त धान्य दुकान  शेटफळ येथील स्वस्त धान्य दुकानदारास तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यासाठी देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय