नीरा उजवा कालव्यावरील फाटा नं. ६१ वरील दार नं. १५ वर कोंडबावी गावातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. नदीकडे जाणाऱ्या पाटावरून ७० टक्के शेतीला पाणी मिळते. जेव्हा १५ नंबर दाराने पाणी सोडले, तेव्हा गावाकडे जाणारा पाण्याचा प्रवाह चालू होता, परंतु नदीकडील बाजूस पाणी घेण्यासाठी संबंधित शेतकरी आले असता, स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना अटकाव करून तो पाट बंद केला. यावेळी पाटबंधारे खात्याचे संबंधित राखणदार, पाटकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी याबाबत कुठलीही कारवाई न करता, तेथून पोबारा केला. यावेळी भीमराव फुले, संजय मगर, बाबासाहेब कारंडे, आयुब मुलाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या आठ दिवसांत आमच्या शेतीला पाणीपुरवठा न केल्यास, आम्ही सर्व शेतकरी कुटुंबासह उपोषणास बसणार असल्याचा इशारा तानाजी रेडेकर यांनी दिला.
आमचं मिटलंय...
उपोषणस्थळी भेट देऊन शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांचे क्षेत्र सिंचन केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, त्यांना फोन केला असता, आमचं मिटलंय, आता १० मिनिटांनी फोन करतो, अशी माहिती उपअभियंता अमोल मस्कर यांनी दिली.
फोटो ::::::::::::::::
पाटबंधारे विभागाच्या कारभाराला कंटाळून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले कोंडबावी येथील तानाजी रेडकर व शेतकरी.