राकेश कदम - सोलापूर - काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना रविवारी सोलापुरात विचारण्यात आला. भाजपचे नेते काय चिंचोके घेऊन निवडणुका लढतात का? भाजप नेत्यांचे काय असावा राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, भाजपचे नेते देशातील जातीपातींमध्ये वाद लावायचा काम करत आहे. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यात कधीच नव्हता. पण हे सध्या सुरु आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. जे कोणी दुर्बल आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युद्ध थांबवतात. पण महाराष्ट्रच्या प्रश्नावर त्यांची भूमिका आली का?, असा सवाल ही संजय राऊत यांनी केला.
देशातील घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली आहे. रावणाची जशी दहातोंडे होती. ही दहा तोंडे जशी उडवली गेली, तशी राजकारणाची उडवली जातील, असे राऊत म्हणाले.