संजय बोकेफोडे
कुसळंब : निसर्गाची वारंवार हुलकावणी़़़ शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव़़़़वडिलार्जित २६ एकरांत पारंपरिक पिकाशिवाय फारसे काही पिकायचे नाही़़़सीताफळाला फाटा देत दोन एकरांत थाई वाणाच्या पेरुची लागवड केली़ एक एकरात १८ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे वाणेवाडी(ता़ बार्शी) येथील एका युवा शेतकºयाने.
खंडेराव दत्तात्रेय लवांड असे त्या युवा शेतकºयाचे नाव आहे़ बार्शी तालुक्यातील कुसळंबपासून चार किलोमीटरवर वाणेवाडी हे गाव आहे़ गावातील शेतकºयांचा सारा कल सीताफळ लागवडीकडे आहे़ परंतु खंडेराव लवांड यांनी पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी थाई वाणाच्या पेरूची लागवड करुन एकरी १८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. प्रथम सात किलोमीटर अंतरावर बाभळगाव येथील विहिरीतून पाईपलाईन करुन पाण्याची व्यवस्था केली.
शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षांपूर्वी ‘थाई’ वाणाच्या पेरुची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांनी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले़ अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळापेक्षाही दुपटीने उत्पादन मिळाले़ संपूर्ण तालुक्यात थाई वाणाच्या पेरूची पहिली बाग फुलविण्याचा प्रयोग युवा शेतकरी खंडेराव यांनी केला़ थाई वाणाचा प्रसार इतका झाला की बाजारपेठेत जाण्याऐवजी बाहेरील व्यापारी बांधावर येऊन ४० रुपये दराने फळं घेतली़ त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचला़ त्यामुळे एकरी १८ लाखांचे उत्पादन मिळाले़ मात्र एका एकरावरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला.
या लागवड खर्चात ५० हजार हे मशागत आणि फवारण्यांसाठी तर ५० हजार रुपये मजुरीवर खर्ची झाले. पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असते़ या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात. या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्य़ पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढणीनंतर जवळपास २० दिवस टिकून राहते़ तसेच त्यात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहे. या पेरुची विक्रीही सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे़ स्थानिक पातळीवर बार्शी बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात हा पेरू विकला जातोय.
इस्राईल पद्धतीने लागवड - दोन ओळींमधील अंतर दहा फूट तर दोन झाडांमधील अंतर पाच फूट राखून पेरुची लागवड केली़ एका एकरात ८०० रोपे लावली़ ही सर्व लागवड इस्राईल पद्धतीने केली़ त्यांनी दोन एकरांत १६०० रोपे लावली़ केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली़ झाडं एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला ४० ते ४५ किलो उत्पादन निघाले़ दुसºयाच वर्षी प्रत्येक झाडाला किमान १०० किलो माल निघाला़ सुरुवातीला दर ६० रुपये मिळाला़
निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते़ यात आर्थिक गणित कोलमडते़ त्यामुळे शेतकºयांनी परंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे़ पेरुसाठी मनुष्यबळ आणि लागवड खर्चही कमी आहे़ त्यातून नफा जास्त मिळतो आहे़ शेतकºयांनी बाजारपेठेतली गरज ओळखून पिके घ्यावीत़ - खंडेराय लवांड पेरु उत्पादक, वाणेवाडी