जिल्ह्यातील ज्या अंशतः अनुदानित शाळा व उच्च माध्यमिकच्या तुकड्यांची शासन स्तरावर कसून तपासणी झाली असतानाही कोणी एकाने तक्रार केल्याने या शाळा अपात्र केल्या होत्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आसगावकर हे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय (पुणे) येथे गेले.
तेथे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्यासमवेत त्यांच्यासह महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, अण्णासाहेब गायकवाड, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, दत्ता गाजरे, गुरुनाथ वांगीकर, संदीप पाथरे, सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर उपस्थित होते. या बैठकीत हा प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल आसगावकर यांचा जिल्ह्यातील सर्व शाळांच्या संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
कोट ::
शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील. प्रसंगी अधिकाऱ्यांशी संघर्ष झाला तरी चालेल अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही.
- प्रा. जयंत आसगावकर,
शिक्षक आमदार
पुणे विभाग