शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:53 PM

आध्यात्मिक; रमजान ईद विशेष...

हजरत अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि) हजरत सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसºयाला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.

’ प्रेषित (स.) म्हणाले, ‘आमनतु बिल्लाही’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लीम)म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे. हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली. हजरत मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाºयांना आणि त्याचा अवलंब करणाºयांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाºयांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेली संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.

तिबरानीने हजरत मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन सांगितले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील. त्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे प्रेषित मुहम्मद (स.)! अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?’’ तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाला ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’ हजरत अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्य संकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे वीराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.- आसिफ इक्बाल 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईद