आयुक्तांनी परत यावे: सभागृह नेते कोठे, बेरिया यांचा सवालसोलापूर: आमच्या पक्षाने लोकशाही मार्गाने पाण्यासाठी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले़ कोणतीही मोडतोड नाही, शिवीगाळ नाही असे असताना आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांचे ऐकून घ्यायला हवे होते, त्यांनी अशी टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे, असे मत मनपाचे सभागृहनेते महेश कोठे आणि माजी महापौर ॲड़ यु़ एऩ बेरिया यांनी व्यक्त केले़ आयुक्तांनी परत मनपाचा पदभार घ्यावा, आम्ही त्यांना सहकार्य करु, असेही ते म्हणाले़शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ माझ्या घरकूल भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसेल तर मी आयुक्तांना विचारुदेखील नये का़ गेल्या वर्षी उजनी धरण मायनसमध्ये असतानाही पाणीपुरवठा तीन दिवसाआड होता; मात्र यंदा पाणी मुबलक असतानादेखील प्रशासनाकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्यामुळे अनेक भागात नागरिकांची तारांबळ उडत आहे़ आयुक्तांनी नगरसेवकांच्या भावना ऐकायला हव्या होत्या मात्र मनपा सोडून जाणे शोभत नाही, असे बेरिया म्हणाले़ आजवर आम्ही आयुक्तांना सहकार्य केले आहे. मात्र ते आम्हाला विश्वासात घेत नाहीत, तरीही त्यांचे काम चांगले आहे म्हणून त्यांना आम्ही यापुढे देखील सहकार्य करु, असे बेरिया यांनी यावेळी सांगितले़ कराडो रुपयांचा निधी पाण्यासाठी दिला तरीही पाणीपुरवठा सुधारत नाही हे देखील महत्त्वाचे आहे़ आंदोलनकर्ते नेहमीच्या स्टाईलमध्ये खुर्च्या खाली करा, असे म्हटले म्हणजे लगेचच पद सोडणे चुकीचे आहे़ शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल पदाधिकारी आणि प्रशासन बसून तोडगा काढला पाहिजे असे कोठे म्हणाले़ एनटीपीसीकडून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समांतर जलवाहिनी मंजूर करुन घेतली आहे. शिवाय आयुक्तांनी केलेल्या १४२८ कोटींच्या डीपीआरमध्ये आणखी एका जलवाहिनीचा समावेश आहे, त्यामुळे पुढील वर्षी निश्चित शहरावरील जलसंकट नष्ट होईल, असे कोठे म्हणाले़ -------------------------सोलापूर बंद हा राजकीय स्टंटविरोधकांनी बुधवारी पुकारलेला सोलापूर बंद हा राजकीय स्टंट आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या स्टंटबाजीला बळू पडू नये, असे आवाहन माजी महापौर ॲड़ बेरिया यांनी व्यक्त केले़ तीन दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी दिले पाहिजे ही भूमिका भाजप-सेनेचीदेखील आहे. तीच आमची देखील आहे त्यात गैर काय आता मात्र आमच्या विरोधात आंदोलन सुरू केले ही दुटप्पी भूमिका नव्हे काय ?
लोकशाही मार्गाने पाणी मागणे गुन्हा आहे का?
By admin | Published: May 06, 2014 10:07 PM