शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

रक्कम गोळा केली, मुली दाखवण्याचे मेळावे अन् तारखा देऊन सर्वांना लग्नाच्या नादी लावले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:31 PM

सोलापूरमधील प्रकार....

बार्शी: गेली पाच महिन्यांपासून मुलाचा विवाह जमवून देण्यासाठी सुशिक्षित महिला वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जमवतो...मुली दाखवतो, असे सांगून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊनही मुली दाखविल्या नसल्याने बार्शी तालुका पोलिसांत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २२ ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान घडला. 

याबाबत दीपक गणपत खंडे (रा.अंबड, ता. माढा) याने तालुका पोलिसांत तक्रार देताच अंजली श्रीमंत धावणे (रा. सुभाषनगर, बार्शी), कैलास विठ्ठल नायकनदे (रा. पाटसांगवी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), रामा खैरे (रा. पचपिंपळ, ता. परांडा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तिघांनी मिळून सुशिक्षित महिला मराठा वधू-वर परिचय मेळावा नावाने अनधिकृत परवाना संस्था निर्माण केली व त्यांनी जवळ जवळ ३५० युवकांचे बायोडाटा घेऊन मुली दाखवतो, असे सांगून यांनी मोठ्या स्वरूपात रकमाही गोळा केल्या. 

रक्कम गोळा केल्यानंतर विविध ठिकाणी मुलगी दाखविण्याचे मेळावे भरवून विवाहाच्या तारखा देऊन सर्वांना नादी लावले. दि. २८ जानेवारी रोजी बार्शी येथील किलचे मंगल कार्यालयात तिसरा मेळावा भरवला होता. वधू मिळणार म्हणून मोठ्या आशेने अनेक युवक व पालक सहभागी झाले होते. पण त्या ठिकाणी एकाही वधूचा पत्ता नव्हता. त्यासाठी आयोजकांनी पुढील तारीख दिल्याने याबाबत संशय आल्याने पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधून बोलावून घेतले.

वधू-वरांचे बायोडाटाच मिळाले नाहीत-

पोलिसांनी आयोजकांकडे चौकशी करत असताना वधू-वराचे बायोडाटा मिळाले नाहीत. त्यांनी फक्त पैसे मिळविण्याचा हेतूने हा प्रकार केल्याचा संशय येताच त्यांना ताब्यात घेतले, तर दिलेल्या फिर्यादीत २३ जणांची नावे टाकून यांचीही फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. पुढील तपास स. पो. फौजदार जनार्दन सिरसट करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूरPoliceपोलिस