- आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहराला आज जे पाणी मिळते ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच. भाजपमुळे सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. उजनी - सोलापूर समांतर जलवाहिनीचा एक पाईप सुद्धा भाजपवाल्यांनी टाकली नाही, त्यामुळे सोलापूरकरांचे पाण्यासाठी हाल सुरु असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
जुना प्रभाग क्रमांक २२ पोगुल मळा, रामवाडी येथे "हात से हात जोडो" अभियानाची महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी आमदार प्रणिती शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत राजनंदा गणेश डोंगरे यांनी तर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा स्वागत गणेश डोंगरे यांनी केले.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपावाल्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, त्यांना फक्त सत्तेशी देणेघेणे आहे. सत्ता मिळाली की जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे व आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे कामे करतात. सोलापुर शहरात हात से हात जोडो अभियानाद्वारे रेशन, पेंशन, दाखले मिळवून देणे, मदतकार्य, महागाई, बेरोजगारी, तसेच जनतेच्या कोणत्याही अडचणी असू दया ते सर्व सोडविणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास संयोजक गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, देवाभाऊ गायकवाड, अँड केशव इंगळे, अंबादास करगुळे, नागनाथ कदम, भारत जाधव, अनिल मस्के, युवराज जाधव, अनिल जाधव, अंबादास गायकवाड, नागनाथ कासलोलकर, युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, श्रीकांत वाडेकर, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, अँड मयूर खरात, बालाजी जाधव, पवन गायकवाड़, अँड शुभम माने, दाऊद नदाफ, सुमन जाधव, कुणाल गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.