आप्पासाहेब पाटील
सोलापूर : माझे प्राथमिक शिक्षण उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात पूर्ण झाले़ त्यानंतर अकरावी व बारावी भौतिकशास्त्र व गणित विषय माझ्या आवडीचे़ म्हणूनच भौतिकशास्त्राचे पांडे व गणिताचे डीक़े़ गुप्ता हे शिक्षक माझ्या आवडीचे़ शिक्षकांनी जसा भौतिकशास्त्र व गणिताचा पाया भक्कम केला होता तसे आयुष्याचे गणितही जुळवून दिले़ त्यांनीच मला आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची ऊर्जा निर्माण केली़ युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वेत विभागीय व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना हितेंद्र मल्होत्रा यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
आपल्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी बोलताना हितेंद्र मल्होत्रा म्हणाले की, अकरावी व बारावीनंतर मी आयआयटीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले़ त्यानंतर युपीएससी परीक्षा पास झालो़ माझी रेल्वेतील पहिली पोस्टींगही नाशिक येथे सहायक विद्युत अभियंता या पदावर झाली़ त्यानंतर लखनऊ येथे रेल्वे डिझाईन अॅन्ड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन या पदावर पाच वर्षे काम केले़ दरम्यान, उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक या पदावर नियुक्ती झाली़ तीन वर्षे या पदावर सेवा केल्यानंतर मला एक वर्षासाठी नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होेते़ त्यानंतर मुंबईच्या पश्चिम रेल्वेत मुख्य विद्युत लोको अभियंता या पदावर काम करीत असताना माझी सोलापूर येथे विभागीय व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.
शिक्षकांमुळे करिअरमध्ये अडचणी आल्या नाहीत..माझे भौतिकशास्त्राचे शिक्षक पांडे व गणिताचे शिक्षक डी़ के. गुप्ता यांनी माझ्या शैक्षणिक वाटचालीत भौतिकशास्त्र व गणित विषयाची आवड निर्माण केली़ त्यामुळे मी प्रत्येक वर्षी टॉपवरच होतो़ मन लावून शिक्षण घेतल्यामुळे मला माझ्या करिअरमध्ये काही अडचणी आल्या नाहीत़ आजपर्यंत चांगल्या पोस्टंींगवरच काम करीत आहे़ भविष्यात मोठ्या पदावर काम करेऩ
अकरावी व बारावीनंतर मी आयआयटीमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळविला़ एक चांगला शिक्षक तुमच्या भविष्यातील सर्वच मार्ग निश्चित करतो़ त्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करायला हवा़ विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण करण्या.
चे काम शिक्षकांचे असते़ शिक्षकांनी ती आवड निर्माण केल्यास विद्यार्थ्याना भविष्यात येणाºया करिअरला अडचणी निर्माण होत नाहीत़ विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति आदर व कृतज्ञतेची भावना ठेवावी असा सल्लाही हितेंद्र मल्होत्रा यांनी दिला़
त्या छडीची आजही भीती वाटते..मी अकरावी व बारावी शिकत असताना रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक मिस्टर जेम्स हे अत्यंत कडक स्वभावाचे होते़ कोणताही विद्यार्थी चुकला अथवा अभ्यास न केल्यास त्या विद्यार्थ्याला शिक्षक जेम्स हे पट्टीने (छडी) हातावर मारत असत़ त्यांनी केलेली शिक्षा ही त्यावेळी खूप मोठी वाटत होती़ आजही त्या मिस्टर जेम्स यांचे नाव जरी ऐकले तर त्या छडीची आठवण येते अन् भीतीही वाटते़