अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूट व फिनिक्स एज्युकेशन ॲकॅडमीतर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. प्रमुख म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते. यावेळी सहारा इन्स्टिट्यूटचे सचिव डॉ. राहुल जवंजाळ, डॉ. श्रद्धा जवंजाळ आदी उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिरासाठी अकलूजसह माळशिरस, इंदापूर, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये
नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे सहारा इन्स्टिट्यूटचे डॉ. राहुल जवंजाळ व फिनिक्स एज्युकेशन ॲकॅडमीतर्फे परदेशात एमबीबीएस करणे यावरील चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर स्तुत्य उपक्रम आहे. परदेशातील कमी खर्चिक वैद्यकीय शिक्षणासाठी अकलूज येथे कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील, याबाबत यापुढेही त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे. याबरोबर पालकांनीही आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर करण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
ओळी ::::::::::::::::::::::
अकलूज येथील मार्गदर्शन शिबिर व चर्चासत्राचे उद्घाटन करताना धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. राहुल जवंजाळ, डॉ. सुदर्शन घेरडे, डॉ. श्रद्धा जवंजाळ आदी.