गळवेवाडी (ता. आटपाडी) व सध्या कोळे (ता. सांगोला) येथील अंजना सुधीर गळवे व सुधीर हरिबा गळवे हे पती-पत्नी १ जानेवारी रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास मित्राच्या घरी जेवण करून भावाच्या घरी आले. यावेळी भाऊ संभाजी करांडे यांनी तुम्ही बाहेर जेवण करून का आला, या कारणावरून वाद करून त्याने बुक्कीने बहीण अंजना हिच्या डोळ्याच्या खाली व उजव्या जबड्यावर जोरात मारल्यामुळे तिच्या तोंडातील तीन दात पडले. दरम्यान पती सुधीर गळवे हे सोडवण्यासाठी आले असता त्याने त्यांनाही शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली. यामध्ये ते जखमी झाले. हा प्रकार पाहून आई शांताबाई करांडे हिने देखील मुलगी अंजनास हाताने चापटा मारून मुलगा संभाजी यास तिला लाकडाने मार म्हणून प्रोत्साहन दिले. याबाबत, अंजना सुधीर गळवे हिने आई व भावाविरूद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
सख्ख्या बहिणीला बाहेर जेवण करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:22 AM