करमाळा : करमाळा शहरातील जय महाराष्ट्र चौकात शिवीगाळ करणे सहाजणांच्या चांगलेच अंगलट आले आले आहे. त्या सहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सहायक फौजदार अण्णासाहेब वणे यांनी फिर्याद दिली आहे. ते न्यायालयातील काम उरकून जेवायला घरी निघाले होते. इतक्यात जय महाराष्ट्र चौकात मोठी गर्दी दिसली. तेथे सहाजण भांडत होते. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची गच्ची पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना शिव्या देत होते. वणे हे तेथे पोहोचताच त्यांना पाहून शिवीगाळ करणारे पळून गेले. पोलीस चौकशीत अमीर मुलाणी, तौफीक शेख, अमीर बेग, प्रीतम कुकडे, राहुल कुकडे, तानाजी कुकडे (सर्व रा. करमाळा) यांची नावे निष्पन्न झाली असून, याप्रकरणी पोलीिसांनी गुन्हा दाखल केला आहे.