सोलापूर: सोलापूरमध्ये कोरोना पॉझीटीव्हच्या वाढत चाललेल्या रुग्णांची चिंता भेडसावत असताना दुसरीकडे कोरोनाचे यापूर्वी अॅडमिट केलेले रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. या रुग्णांची २८ एप्रिल रोजी पुन्हा टेस्ट घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.
देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना सोलापुरात मात्र एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे सोलापूर ग्रीन झोनमध्ये जाणार अशी चर्चा असतानाच १३ एप्रिल रोजी पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला.
उपचारादरम्यान मरण पावलेल्या किरणा दुकानदाराची टेस्ट पॉझीटीव्ह आली होती. त्यानंतर प्रशासनाने आरोग्य यंत्रणा कामाला लावली. तेलंगी पाच्छापेठेतील त्या रुग्णाची हिस्ट्री तपासण्यात आली. त्या रुग्णाला त्रास होऊ लागल्याने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णालयातील कर्मचाºयांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्या रुग्णालयातील स्वागतिकेचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला. त्या अनुषंगाने तिच्या संपर्कातील लोकांची तपासणी केल्यावर १८ जण पॉझीटीव्ह निघाले आहेत.
यात पहिल्या टप्प्यात अॅडमिट झालेल्या रुग्णांची २८ एप्रिल रोजी १४ दिवस पूर्ण होत आहेत. आता पूर्ण बºया झालेल्या सुमारे आठ रुग्णांची पुन्हा एकदा दुबार कोरोणा टेस्ट घेतली जाणार आहे. यात जर चाचणी निगेटीव्ह आली तर त्यांना घरी सोडण्यास परवानगी दिली जाणार आहे.
टेस्टनंतर घेणार निर्णय
सोलापुरात आत्तापर्यंत आढळलेल्या पॉझीटीव्ह रुग्णांपैकी पहिल्या टप्प्यातील रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाल्याचा दुसºया टेस्टनंतर स्पष्ट होईल. या रुग्णांना घरी सोडायचे की आणखी १४ दिवस इन्स्टिट्युटमध्ये क्वारंटाईन करायचे हे डॉक्टरांशी चर्चा करून ठरविले जाणार असल्याचे जिल्हाधिकरी शंभरकर यांनी सांगितले.