सोलापूर : सोलापूर शहारासोबतच संपूर्ण जिल्ह्यात 3 व 4 मे 2022 रोजी विजांच्या कडकडाट व गडगडाटासह, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, याच काळात जोरदार वारे (30-40 किमी प्रतितास) वाहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोलापूर सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान एप्रिल महिन्यातच 43 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडा वाढला आहे त्यामुळे सोलापूरकरांची लाही लाही होत असल्याचे सांगण्यात आले.