हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने दिले. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हाव्यात. त्याचा फरक मिळावा, त्यासोबतच १०, २०, ३० वर्षांच्या लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी, पाच दिवसांचा आठवडा लागू व्हावा, या मागण्या निवेदनामध्ये केल्या आहेत.
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी वित्तमंत्री, उच्च शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तानाजी ठोंबरे, ए. बी. कुलकर्णी, प्रवीण मस्तुद, उमेश मदने, विलास कोठावळे, सुधीर सेवकर, गणेश करंजकर, आरती रावळे, हनुमंत कारमकर उपस्थित होते.
झाडबुके, बारबोलेंच्या हस्ते सत्कार
आसगावकर यांनी माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे आणि यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विक्रम सावळे, नागेश कानडे, उमाकांत राऊत उपस्थित होते.