शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शहर व जिल्हाच्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात किमान 35 ते 40 मिलिमीटर पाऊस पडण्याची अंदाज कृषी हवामान विभागाने वर्तवला आहे.
मागील तीन ते चार वर्षात सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिली. चांगला पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पाऊस चांगला पडत नसल्यामुळे अनेक पिके हाताची हातातून चालली होती. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या पिकांना जीवनदान मिळाले. 29.6 मिलिमीटर झालेला पाऊस सर्वदूर पडला नव्हता.
या आठवड्यात म्हणजेच बुधवार सहा सप्टेंबर पासून जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून सोलापूर जिल्ह्याला येलो (पिवळे) वार्निंग देण्यात आले आहे. साधारणपणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडत असतो. यावेळीही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.वातावरण पोषक
सध्या वातावरणात 80 ते 85 टक्के आद्रता आहे. वाऱ्याचा वेग ही मंदावला आहे. यामुळे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात येत आहे. चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले तरी ती ही पिके आणखी जगण्यासाठी व वाढण्यासाठी पावसाची गरज आहे या आठवड्यात येणारा पाऊस ही गरज पूर्ण करेल.