सोलापूर : आषाढी वारी असो वा कार्तिक पंढरपुरात ‘विठुनामाचा गजर’ ऐकायला येतो़ मात्र शिवसेनेच्या महासभेच्या निमित्ताने ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा सोमवारी ऐकायला मिळाल्या़आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी हल्ली पहारेकरीच चोऱ्या करायला लागलेत असे सांगून चौकीदारच चोर आहे, याचा पुनरुच्चार केला. युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही, युती करायची की नाही हे जनताच स्पष्ट करेल असे सांगून ठाकरे संपूर्ण भाषणात भाजपाला टार्गेट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.राज्याच्या कानाकोपºयातून खासदार, आमदार, विविध ठिकाणचे पदाधिकारी व शिवसैनिक पंढरपूरला ट्रॅव्हल्स, एस़ टी़ बस, खासगी वाहनाने पहाटेपासून दाखल होत होते़ त्यामुळे पंढरीत सर्वत्र वाहनांची गर्दी झाल्याने चौका चौकात ट्राफिक जाम झाले़ काही शिवसैनिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करून थेट सभास्थळाचा मार्ग धरला़ गळ्यात भगवे उपरणे, डोक्याला भगवी टोपी परिधान करून हे शिवसैनिक घोषणा देत जाताना दिसून आले़महिलांची संख्या लक्षणीयठिकठिकाणाहून पंढरीत दाखल होणाºया महिलांची संख्याही लक्षणीय होती़ भगवी साडी परिधान करून गळ्यात भगवे उपरणे अडकवून या महिला सभास्थळाकडे जात होत्या़अनेक शिष्टमंडळांनीघेतल्या ठाकरे यांच्या भेटीपंढरपुरात आल्यानंतर विश्रामगृहावर धनगर समाज, परीट समाज, महादेव कोळी समाज यांच्यासह अनेक समाजाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेऊन आपले विविध प्रश्न मांडले़ यावर उद्धव ठाकरे म्हणाले की सरकार चांगले काम करीत असले तरी ही शिष्टमंडळे त्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे आली असते का?युती व्हावी ही जनतेची इच्छा - दानवेआगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नागपूरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले.
पंढरीत ‘जय श्रीराम’चा नारा! महासभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:28 AM