सोलापूर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे हवाई हल्ला करत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले़ भारतीय वायुसेनेच्या जिगरबाज मिराज २००० जातीच्या १२ विमानांनी १ हजार किलोच्या बॉम्बचा मारा करत दहशतवाद्यांचा खात्मा केला़ या कारवाईची वार्ता सोशल मीडिया व प्रसार माध्यमातून समजताच सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध संघटना, राजकीय पक्ष, संस्था, शाळा, महाविद्यालयांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ हमसे जो टकरायेगा...मिठ्ठी में मिल जायेगा...भारत माता की जय...सुन ले बेटा पाकिस्ताऩ़़बाप है तेरा हिंदुस्ताऩ़़ अशा एकापेक्षा एक घोषणा देत शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ जैशच्या अतिरेक्यांचा खातमा करून जशास तसे प्रत्युत्तर दिल्याचा जोश काही वेगळाच होता.
उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी नियंत्रण रेषा पार करत आत घुसून हल्ला केला होता़ दहशतवाद्यांना त्यात कंठस्नान घालण्यात आले होते़ पुलवामा हल्ल्यानंतर भारत पुन्हा एकदा असा सर्जिकल स्ट्राईक करू शकेल या भीतीने दहशतवाद्यांनी त्यांचे तळ पाकिस्तानातील अंतर्गत भागात हलविले होते़ यामुळे सैन्यदलांना गुप्तरूपाने जमिनीवरील हल्ला करण्याचा पर्याय कठीण बनला होता़ एअरस्टाईकचा पर्याय अधिक सोपा होता तसेच लष्करी कारवाईत सरप्राईज एलिमेंटला म्हणजेच अचानक हल्ला करण्याच्या युद्धनीतीस फार महत्त्व असते़ छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील शाहीस्तेखानावर असाच सर्जिकल स्ट्राईक केला होता़ त्याचीच पुनरावृत्ती भारतीय हवाईदलाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास केली.
भाजपाचा जल्लोषभारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून पुलवामा येथे आतंकवादी पुरस्कृत झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला़ याबद्दल भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा पुतळा चौकात पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते संजय कोळी, महिलाध्यक्षा इंदिरा कुडक्याल, प्रा़ मोहिनी पत्की, हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, गीता पाटोळे, विजय इप्पायकाल, रामचंद्र जन्नू, राजकुमार काकडे, अक्षय अंजिखाने, सागर आतनुरे, सोमनाथ केंगनाळकर, रामचंद्र मुटकेरी, बाशा शेख, रफिक सय्यद, जाकीर डोका, यतीराज व्हनमाने, भीमा आसादे, व्यंकटेश कोंडे, श्रीनिवास पुरुड, नागेश पासकंटी, अशोक गोन्याल, अंबादास जाधव, विशाल गायकवाड, अमोल गायकवाड आदी शहर भाजपातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेने वाटली नवीपेठेत मिठाईभारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केल्याबद्दल शहरातील नवी पेठेत शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला़ यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मिठाई, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला़ हमसे जो टकरायेगा़़़मिठ्ठी मे मिल जायेगा़़़भारत माता की जय़़़सुन ले बेटा पाकिस्ताऩ़़बाप है तेरा हिंदुस्ताऩ़़एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो़़़अशा एकापेक्षा एक घोषणा देत रस्त्यांवर जाणाºया नागरिकांना पेढे वाटप केले़ याचवेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, विद्यार्थी सेनेचे महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गणेशकर, संतोष खरात, अमोल कदम, उज्ज्वल दीक्षित, महेंद्र गोसावी, ब्रह्मदेव गायकवाड, बजरंग धायगोडे, गजानन धुम्मा, बबलू कोकरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे जल्लोषजुना तुळजापूर नाका मड्डी वस्ती येथील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ जल्लोष करण्यात आला़ यावेळी भारत माता की जय़़़जय हिंद़़़़पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या़ यावेळी शिवशक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील ढोणे, मिथुन शिंगे, लक्ष्मण विटकर, संजय भेरनूर, सुधाकर बेडसूर, ईरप्पा पुजारी, आकाश कुरुडे, रोहित गोरे आदी उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टीतर्फे आनंदोत्सवपुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारताचे ४० सैनिक शहीद झाले होते़ या हल्ल्याचे उत्तर म्हणून मंगळवारी पहाटे ३.३० वाजता भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर हवाई हल्ला केला़ या कारवाईच्या समर्थनार्थ प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रबुद्ध भारत चौक येथे आतषबाजी व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ यावेळी पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे आदी पी.बी. ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाकिस्तानला भारतीयांचा व्हॉट्सअॅप स्ट्राईक- भारतीय वायूसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राईक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ‘जैश-ए-मोहम्मदह्णच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने मंगळवारी पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे.
दशभूजा गणपती प्रतिष्ठानतर्फे एअर स्ट्राईकचा आनंदोत्सवच्पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर मंगळवारी पहाटे हवाई दलाच्या जवानांनी ३०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करून पाकिस्तानला धडा शिकविल्याबद्दल दशभूजा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. प्रतिष्ठानचे संस्थापक देविदास बनसोडे म्हणाले, वायूसेना दलातील जवानांनी ३०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. यामुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला. पाकिस्तान पुन्हा तोंड उघडणार नाही, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन कठोर पावले उचलावीत. यावेळी सुरेश भगत, रवी मस्के, अजय जाधव, परशुराम कोळी, मंगेश बोंडके, प्रथमेश माने, सुजल पांढरे, सुमित पिसाळ, श्रेयस बोंडगे आदी उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठानतर्फे मिठाई वाटून केला जल्लोष भारतीय सैनिकांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या सोलापूर विभागाकडून सोलापुरातील सैनिकांना फेटे बांधून, मिठाई भरवून जल्लोष करण्यात आला. श्री गुरूनानक चौकातील रक्षाविहार येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर ९ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर जीत बहादूर गुरुंग, सुभेदार मेजर नरेंद्र दत्त आणि सुभेदार मेजर नाना मंडलिक होते.
प्रारंभी सैन्य अधिकाºयांना फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यानंतर अधिकाºयांसह सर्व सैनिकांना मिठाई भरविण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय, हिंदू धर्म जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
यावेळी हवालदार मेजर बाबू शिंदे, हवालदार मोहन लाल, एफ. एस. पाटील, रतिलाल वागज, सुरेश घोडे, मुकुंद खरमाले, वसंत जाधव, कुलदीप सिंग, किरण माने, बाबासो पाटील, गुंडू पंडित तसेच श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे समर्थ मोटे, रवी गोणे, रणधीर स्वामी, सौरभ पवार, वैभव पोळ, हर्षवर्धन सस्ते, समीर पाटील, अक्षय माने, अनुप कुलकर्णी, आदित्य कारकल, संतोष वेदपाठक, रमेश दळवी आदी उपस्थित होते.