कुरुल : मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य बाळराजे पाटील यांचे कट्टर समर्थक पोपटराव जाधव व काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांच्या नेतृत्वाखालील जकराया परिवर्तन ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ६ जागा जिंकून सर्वपक्षीय आघाडीवर मात करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे . विरोधी भीमा परिवार व सर्वपक्षीय आघाडीला तीन जागा मिळाल्या. येणकी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण पुरुषासाठी खुले झाले असून या पॅनलने सरपंच पदाचे नेतृत्व बाळराजे पाटील समर्थक पोपट जाधव यांच्या हाती सोपवणार आहे.
येणकी ग्रामपंचायतीवर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाधव यांच्या गटावर मात करून भीमा परिवार व सर्वपक्षीय आघाडीने ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला होता. या आघाडीला या निवडणुकीत अपयश पदरी पडले.
जय जकराया परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे पोपट जाधव, वंदना गुंड ,सुवर्णा हाके ,आकाश खरात, केराप्पा कोळी , ताई कसबे हे आहेत . तर विरोधी भीमा परिवाराचे तीन विजयी उमेदवार समाधान घुले , चंद्रकला गुंड ,सोनाली परीट हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा जकराया मंदिरात सत्कार करण्यात आला . यावेळी साहेबराव पाटील,भास्कर इंगळे ,दशरथ गुंड , केशवराव जाधव, बळीराम गुंड, तानाजी जाधव,बालाजी गुंड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
फोटो : ०९ येणकी
येणकी ग्रामपंचायत विजयी उमेदवारांचा बाळराजे पाटील यांच्या हस्ते सत्कार करताना गौरव खरात, पोपट जाधव, तानाजी जाधव