सोलापूर : राज्यात सलग दुसऱ्या महिन्यात जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती कायम आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जळगाव आणि सोलापूरचा मृत्यूदर अनुक्रमे ११.३२ आणि ८.६७ राहिला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रसार झाला आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी मृत्यूदर कमी राहील असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर वाढत आहे. मे महिन्यात जळगावचा मृत्यूदर ११.५३ टक्के तर सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर १०.०९ टक्के होता. जूनच्या पहिल्या आठवड्यातच हे दोन्ही जिल्हे दुर्दैवाने टॉपवर आहेत. सोलापूरचा मृत्यूदर दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. सोलापूरनंतर नाशिक आणि अमरावतीचा मृत्यूनंतर ६.२३ टक्के आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार शनिवारपर्यंत राज्यात सर्वाधिक ४७ हजार ३५४ रुग्ण मुंबईत शहरात आढळून आले. यातील १५७७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईनंतर ठाण्यात १२ हजार ४६४ रुग्ण आढळून आले. यातील ३२२ जणांचा मृत्यू झाला. पुणे तिसºया क्रमांकावर आहे. पुण्यात ९२८९ रुग्ण आढळून आले आणि ४०० जणांचा मृत्यू झाला. मुंबईचा मृत्यूदर ३.३३ टक्के, ठाण्याचा २.५८ टक्के तर पुण्याचा ४.३१ टक्के आहे.सोलापुरात समन्वयाचा अभावसोलापूर शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून व्यवस्थित काम झाले नाही. यंत्रणेत अद्यापही समन्वय नाही. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना तत्काळ ताब्यात घेतले जात नाही. क्वॉरंटाईन केंद्रामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकाच ठिकाणी राहिले, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.‘या’ जिल्ह्यात एकही मृत्यू नाहीआरोग्य विभागाच्या माहितीनुसार शनिवारी रात्रीपर्यंत सिंधुदुर्ग, हिंगोली, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. येथे एकही मृत्यू झालेला नाही. वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण आढळून आले यात एकाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातही ५३ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.