बार्शी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बार्शीच्या दादासाहेब जानराव प्रतिष्ठान व मित्रपरिवार यांच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयासाठी १४ ऑक्सिजन टाक्या भरून पुरवठा करण्यात आल्या.
हा उपक्रम जागतिक कामगार दिन व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरवठा करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के यांनी या उपक्रमामागचा हेतू विषद केला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बोपलकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी दादासाहेब जानराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील जानराव, संयोजक सागर जानराव, सोमनाथ भोरे, गणेश शेलार, अमर लोमटे, रवी झोबांङे, धनंजय पाटील, पायाळ, विजय जाधव, संकेत लांडगे, यश ननवरे, किशोर सोनवणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी श्याम शिंदे, राहुल घनाते, सुमित खुरंगळे, बालाजी भोसले, सुमित जानराव, रोहन जगताप, खंडू भोरे, ऋषिकेश गोरे, भीम आर्मीचे अध्यक्ष बबन बनसोडे उपस्थित होते.
---
०३ बार्शी
जानराव प्रतिष्ठानतर्फे बार्शी ग्रामीण रुग्णाला ११ ऑक्सिजन टाकी प्रदान करताना बोपलकर, सुनील जानराव, सागर जानराव, सोमनाथ भोरे