पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने कदापिही करू नये. सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे. त्याची सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित अध्यादेश काढावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल खुपसे यांनी दिला आहे. यावेळी माऊली हळणवर, दीपक वाडदेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
इंदापूर-सोलापूरकरांची भांडणे लावली
इंदापूर तालुक्यातील २२ गावे १९७१ पासून पाण्यासाठी झगडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालवा आणि खडकवासला धरणातून तरतूद करून ऊस लावण्याची परवानगी दिली होती. मग ५० वर्षानंतरदेखील तिथले शेतकरी पाण्यासाठी झगडत आहेत. तर त्यांना तरतूद केलेले पाणी गेले कुठे..? असा सवाल करुन त्यांनी केवळ इंदापूर व सोलापूरकरांची भांडणे लावल्याचे महापाप बारामतीकरांनी केले आहे. याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असे अतुल खुपसे-पाटील यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::
उपरी (ता. पंढरपूर) येथे टायर जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करताना उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी.