सोलापूर : देशपातळीवर प्रतिष्ठेची समजल्या जाणाºया जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या धीरज राज सुरते याने अनुसूचित जाती प्रवर्गामधून २४३१ वी रँक मिळवली तर याच महाविद्यालयाच्या समर्थ पोतदार याने इतर मागास वर्गातून २४५० वी रँक मिळवली. याशिवाय संगमेश्वर महाविद्यालयाचा विश्वनाथ पवार ईडब्ल्यूएस या विभागात भारतातून ६५४ वा आला तर अथर्व गोखले ९ हजार ५६ वा आला. बाकलीवाल क्लासचे १५ विद्यार्थी आणि लॉजिक इन्स्टिट्यूटचे ५ विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरले आहेत.
दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटीसाठी प्रयत्न करत असतात. यंदाही अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. धीरजने याने भारतात २ हजारावा क्रमांक मिळवत आयआयटीमध्ये एन्ट्री केली आहे. धीरज हा सोलापुरातील वालचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. २७ मे रोजी आयआयटीतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेत पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. धीरजने ८४ पर्सेंटाईल गुण मिळवत यश संपादन केलं आहे. मुंबई आयआयटीमध्ये मेकॅनिकल विभागात प्रवेश घेण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.
संगमेश्वरच्या विश्वनाथ पवार, अथर्व गोखले, मुदय्या स्वामी यांनी उल्लेखनीय यश मिळवले. यात विश्वनाथ पवार याने ईडब्ल्यूएस या विभागात भारतातून ६५४ वा येण्याचा मान मिळवला. तर अथर्व गोखले ९ हजार ५६ वा आला. आणि मुदय्या स्वामी हा ओबीसी प्रवर्गातून ६ हजार ५७३ वा क्रमांक पटकावला आहे.
या तिघांना अनुक्रमे एकूण २७२ गुणांपैकी (पवार १४४, ,गोखले १३१ आणि स्वामी ८८) एवढ्या गुणानुक्रमांकासह संगमेश्वरचे हे विद्यार्थी सोलापुरातून जेईई अॅडव्हान्स परीक्षेमध्ये अव्वल राहिले. या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव धर्मराज काडादी , प्राचार्य शोभा राजमान्य, उपप्राचार्य आनंद हुली, लॉजिकचे प्रा.सुशांत माळवे आदींनी अभिनंदन केले. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘लॉजिक’चंही लॉजिक ठरलं यशस्वी..- लॉजिक इन्स्टिट्यूटच्या पाच विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शिक्षक सुशांत माळवे, शिवराज बगले आणि अविनाश घोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशवंत विद्यार्थ्यांंमध्ये विश्वनाथ पवार (देशात ७०२९ वी रँक), अथर्व गोखले (९९५६ रँक), समर्थ पोतदार (१२६२ रँक), मुदय्या स्वामी (कॅटेगिरी रँक ६५७३) आणि अथर्व शिंदे (कॅटेगिरी रँक- २७५९) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी आणि जेईई मेन्स २०१९ मध्येही घवघवीत यश मिळवले आहे.
बाकलीवालचे १५ विद्यार्थी ‘आयआयटी’साठी पात्र- यंदाच्या वर्षी २०१९ मध्ये बाकलीवाल क्लास सोलापूर सेंटरचे १५ विद्यार्थी प्रतिष्ठित समजल्या जाणाºया आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये प्रथमेश कणबसकर (देशभरातून २२५२ रँक), यश भागवत (२५६९), अभय कडप्पा (९४४), विनीत डोके (१०४६), निरज रव्वा (३९७१) आणि रितू पाटील (४३१४) असे आॅल इंडिया रँक मिळवून त्यांनी सोलापूरचे नाव उंचावले आहे. सोलापूर जिल्ह्यातून आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून प्रथम येण्याचा मान बाकलीवाल सोलापूर सेंटरने मिळवला असल्याचे क्लासच्या संचालिका भारती शहा यांनी स्पष्ट केले.
शेतकºयाच्या ‘रितू’नं मिळवलं कौतुकास्पद यश- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी नीलकंठ पाटील यांच्या कन्या रितू पाटील या विद्यार्थिनीनं जेईई अॅडव्हान्स परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गात देशभरातून ४३१४ वी रँक मिळवली. दररोज मुळेगाववरुन १२ कि. मी. ये-जा करुन तिने आठ तास अभ्यास करुन आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. बाकलीवाल क्लास आणि एसईएस कॉलेजमधून अध्यापनाचे धडे तिने घेतले. आई संगीता आणि वडील नीलकंठ यांच्या पाठिंब्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो. त्यांनी सतत माझ्या पाठीशी राहून प्रोत्साहन दिल्यामुळेच मी हे यश मिळवू शकले असं रितूनं सांगितलं. ही आनंदाची वार्ता कळताच आई-वडिलांनी तिला पेढा भरवून लेकीनं आमचा विश्वास सार्थ केल्याच्या भावना व्यक्त केल्या.