शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
3
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
5
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
6
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
7
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
8
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
9
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
10
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
11
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
12
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
13
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
14
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
15
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
16
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
17
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
18
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
19
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
20
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

By appasaheb.patil | Published: December 27, 2023 9:34 AM

या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे.

 नासीर कबीर 

करमाळा : आज बुधवार २७ डिसेंबर 2023 रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडी क्र. के.ए. ३२- एन. ०६३१ ने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते तर कंटेनर क्र. आर.जे. ०६ जी.सी. २४८६ हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उपडी पडली. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर चारचाकी एका अंगावर करून जखमींना बाहेर काढले. प्रसंगावधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू ठेवले.या अपघातात श्रीशैल चंदेशा कुंभार (वय-५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय-५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हुवशालमठ (वय-३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला तर शारदा दिपक हिरेमठ (वय-७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सदर अपघातात  गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण (वय-२०, गुलबर्गा) हा किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.