सांगोला : भरधाव वेगाने जाणार्या जीपने ठोकरल्याने दुचाकीवरील वनरक्षक कर्मचारी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना जुनोनी-मिरज रोडवरील ढाब्यासमोर घडली. वसंत सोपान नरळे (रा. तिप्पेहळ्ळी, ता. सांगोला) असे अपघातात ठार झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. तिप्पेहळ्ळी येथील वसंत सोपान नरळे हा वनविभागात वनरक्षक म्हणून सेवेत होता. शुक्रवारी वसंत नरळे हे दुचाकी(क्र. एम.एच.४५ एल.५६२६)वरुन जुनोनी येथील वन कार्यालयात आले होते. त्यांनी आपले शासकीय कामकाज आटोपून परत जुनोनी-मिरज रोडने घराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी तिप्पेहळ्ळी शिवारात ढाब्यासमोरुन घराकडे वळण घेत असताना मिरजकडून भरधाव वेगाने येणार्या जीप(क्र. एम. एच. ४५/ ए. ७२९८) ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत वसंत नरळे रोडवर पडल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अविनाश नामदेव नरळे यांनी खबर दिली असून पोलिसांनी चालक नीलकंठ श्रीशैल्य निरगुडे (रा. आळंद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास हवालदार नागप्पा निंबाळे करीत आहेत.