पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे हे १२ मे रोजी कटफळ हद्दीतील अचकदाणी येथे पेट्रोलिंग करीत असताना हसन महंमद मुलाणी हा एमएच ४५/ एन ९२८६ या जीपमधून पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना संशयस्पदरीत्या मिळून आला. यावेळी पोलिसांनी जीपमधून २ हजार ७६० रुपयांचा सुपरजेम पानमसाला, ५ हजार ६४० रुपयांचा विमल पानमसाला, १ हजार ५०० रुपयांची व्ही १ सुगंधित तंबाखू, २ हजार ७०० रुपयांची एम. सुगंधित तंबाखू, ३१५ रुपयांची एस. ९९ सुगंधित तंबाखू असा १२ हजार ९१५ रुपयांचा गुटखा व २ लाख ५० हजार रुपये किमतीची जीप असा सुमारे २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी हसन महमंद मुलाणी (रा. अचकदाणी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.