अशोक कांबळे
मोहोळ : ‘डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया खुशी का पैगाम कोई..., कभी दर्दनाक...’ या ओळी कानावर पडताच पोस्टमनची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येते़ तांबोळे (ता. मोहोळ) येथील एका पोस्टमास्तरची कथा प्रेरणादायी अशीच आहे.
खेड्यातील, झोपडीत राहणाºया गरिबाच्या मुलाला जेव्हा नोकरीचा कॉल देतो. तेव्हा त्याच्यासह कुटुंबाला जो आनंद होतो, तो आनंदच माझ्या जीवनाची प्रेरणा बनली. कारण अचानक आलेल्या अपंगत्वावर मात करणे कठीण होते़ जेव्हा घरोघरी असे काही पत्र दिल्यानंतर अख्खे कुटुंब आनंदी व्हायचे़ आता फिरणे मुश्कील आहे़ त्यामुळे सध्या घरात पोस्ट कार्यालय सुरू केल्याचे दिलीपकुमार सुतार हे सांगत होते.
तांबोळे गावचे दिलीपकुमार सुतार यांना १९८५ साली अचानक दोन्ही पाय जाऊन अपंगत्व आले. त्यानंतर यावर मात करताना जीवनात अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले़ मात्र पोस्टमास्तरची नोकरी असल्याने दुसºयांच्या सुखात सुख मानत गेलो आणि उत्कृष्ट सेवा बजावण्याचे कर्तव्य करीत आलो़ अपंग असल्याने आपल्याशी कोण विवाह करणार, अशी चिंता होती, पण अलका नामक तरुणीने माझी व्यथा जाणून विवाह केला़ त्यानंतर माझ्या जीवनात प्रत्येक वेळी साथ देत आहे़ पोस्ट सेवेच्या कामातही मला योगदान देत ती उत्साह वाढवित आहे.
आम्हाला एक मुलगा आणि दोन मुली आहेत़ तिन्ही मुले सध्या उच्च शिक्षित आहेत, असे दिलीपकुमार सुतार सांगत होते़पूर्वी सौंदणे मुक्काम आणि पोस्ट तांबोळे होते़ या दोन्ही गावचा पत्रव्यवहार, मनिआॅर्डर देण्याची सेवा चांगल्या प्रकारे करीत असल्याचे आता या दोन्ही गावातील नागरिक सांगतात़ नुकत्याच झालेल्या दिव्यांग दिनानिमित्त तांबोळे येथील झेडपी प्राथमिक शाळेतील शिक्षक हरिदास सावंत व अन्य शिक्षकांनी अपंग पोस्ट मास्तर दिलीपकुमार सुतार यांचा त्यांच्या सेवेबद्दल सत्कार केला़
तो काळ स्मरणात१९८५ ते आजतागायत अविरत सेवा मी बजावत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील अनेकांना लिहिता, वाचता येत नव्हते. त्या प्रत्येक व्यक्तीला पत्र वाचून दाखवणे असेल किंवा त्या पत्राला उत्तर देताना सर्वांना मदत करीत होतो़ पूर्वी अनेकांची मनिआॅर्डर यायची ती प्रामाणिकपणे पोहोच करीत असे़ पोस्टाच्या माध्यमातून अनेकांना पैशाची बचत करावी याची सवय लावली, याचा मला मनस्वी आनंद असल्याचे दिलीपकुमार सुतार सांगतात़ शिवाय अनेकांना नवीन बचत खाते काढायला लावून त्यांचा आर्थिक स्तर उचावण्याचे काम केले आहे. भारतीय डाक कार्यालयांतर्गत ज्या ज्या पोस्टाच्या योजना असतील, या सर्व योजनांची अंमलबजावणी केली आहे़ ३० वर्षांपूर्वीची एक घटना़ एका तरुणास कृषी विभागाच्या नोकरीचा कॉल आला. तो त्याला वाचून दाखवत हातात दिल्यावर त्याच्या चेहºयावरचा आनंद मला आजही स्मरणात आहे, असे ते सांगतात़