खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व माढा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन ही कार्यकारिणी जाहीर केल्याचे बोबडे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे, नूतन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील, बाळासाहेब ढगे उपस्थित होते.
भाजपा माढा तालुका नूतन कार्यकारिणीमध्ये गोविंद पवार, सोमनाथ गायकवाड, मदन मुंगळे, विनायक आवारे, प्रतापराव देशमुख, अमृत अवताडे, मगन महाडिक, शामराव कदम यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी योगेश पाटील व दत्तात्रेय मोरे, चिटणीसपदी तात्यासाहेब मोरे, करण भगत, प्रशांत जाधव, जयसिंग देशमुख, प्रकाश चोपडे यांची तर कोषाध्यक्षपदी तात्यासाहेब गोडगे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी उमेश पाटील यांची तर सरचिटणीसपदी गिरीश तांबे यांची व उपाध्यक्षपदी समाधान अनपट यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुताई मोरे यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी, शिवाजी सुर्वे यांची किसान मोर्चा अध्यक्षपदी, प्रा. रवींद्र ननवरे यांची अनु. जाती मोर्चा अध्यक्षपदी, निवृत्ती तांबे यांची ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी तर दिलीप बारूंगळे यांची आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याच बरोबर कामगार आघाडी संयोजकपदी भय्या मस्के, उद्योग आघाडी संयोजकपदी श्रीकांत लादे, भटके-विमुक्त संयोजकपदी दादासाहेब कळसाईत, वैद्यकीय सेल डॉ. सागर गिड्डे, कायदा सेल ॲड. विजयकुमार अडकर, सहकार सेल नागनाथ कदम, सोशल मीडिया सेल दिनेश शिंदे, माजी सैनिक सेल आनंद गलांडे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल श्रीधर शिंदे, प्रज्ञा सेल अध्यक्षपदी हरिदास रणदिवे, शिक्षक सेल भारत माने यांची संयोजक म्हणून तर अाध्यात्मिक समन्वय संयोजकपदी संकेत पाठक यांची निवड करण्यात आले आहे.
याचबरोबर विविध सेल व मोर्चा यांच्या उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य यांच्यासह ७०० पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष बोबडे यांनी सांगितले.
फोटो: ०२टेंभुर्णी-भाजपा
युवा मोर्चा नूतन अध्यक्ष उमेश पाटील यांचा सत्कार करताना योगेश बोबडे, अमर शेंडे व बाळासाहेब ढगे.
--