शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

केवळ ३५ दिवसात उजनी धरणातून उपसले तब्बल ४२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 4:39 PM

उजनी ५० टक्क्यांवर : नियोजन कोलमडल्याने सुरू आहे वारेमाप उपसा

ठळक मुद्देभीमा नदी, कालवा व बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलेमागील महिनाभरापासून पाणी सुरू असल्याने दररोज पाण्याची पातळी घटत आहे नोव्हेंबर महिन्यातच धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला

भीमानगर : सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी सुरू  असलेल्या पाणी उपशामुळे उजनी धरणाचापाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. आॅगस्ट महिन्यात १११ टक्के भरलेली उजनी तीन महिन्यातच निम्म्यावर आली. केवळ ३५ दिवसात उजनीतून ४२ टक्के पाणी उपसा झाला आहे. 

मंजूर आवर्तनानुसार भीमा नदी, कालवा व बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिनाभरापासून पाणी सुरू असल्याने दररोज पाण्याची पातळी घटत आहे. सोडलेले वारेमाप पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असताना ते होत नसल्याने अतिरिक्त पाणी सोडावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

पदाधिकाºयांचा पाणी सोडण्यासाठी सातत्याने तगादा असल्याने पाणी बंद केले जात नाही. यामुळेच नोव्हेंबर महिन्यातच धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांसाठी २४ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर कालव्यातून  शेतीसाठी ३ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. कालव्याच्या शेवटच्या भागाला मोजून पाणी दिले जात आहे; मात्र धरणाशेजारी व कालव्यालगत महिनाभरापासून पाणी वापर सुरू आहे.  २४ आॅक्टोबर रोजी धरणात ९२.९० टक्के  पाणीसाठा होता तर २८ नोव्हेंबर रोजी  ५०.११ टक्के म्हणजे  ३५ दिवसात धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्याने कमी झाला. 

मागील वर्षी याच दिवशी धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. अशी धरण व्यवस्थापन विभागाकडून माहिती सांगण्यात आली. यंदा मात्र पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट झाली असून त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. वारेमाप पाणी उपशामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. धरणातून सध्या कालवा विसर्ग ३२०० क्युसेक, भीमा-सीना बोगद्यातून  एक हजार क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचनला २८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

उजनीची सद्यस्थिती

  • च्एकूण पाणी पातळी -४९४.६०० मीटर
  • च्एकूण पाणीसाठा -२६३९.०० दलघमी
  • च्उपयुक्त पाणीसाठा -८३६.१९ दलघमी
  •  पाणी पातळी-५०.११ टक्के
  • च्एकूण टीएमसी  ९३.१८
  • च्उपयुक्त टीएमसी  २९.५३
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका