मंगळवेढा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा शेतीशी काहीही संबंध नसल्यामुळे गेल्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
ते मंगळवेढा येथे प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री जयंत पाटील,सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप सोपल , दीपक साळुंखे-पाटील, उमेदवार भगीरथ भालके, उमेश पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनेच आडमुठेपणाची घेतली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस कार्यावर जोरदार टीका केली.
माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितले की, ज्यांना विनोद जमत नाही त्या भानगडीत उगाच पडू नये.
आ.अमोल मिटकरी म्हणाले की भाजपा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे.उद्योगपतींना खुश करण्याकरिता देशाला भुलवले जात आहे. यावेळी स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या मंगळवेढा भुमी संताची गाण्याच्या चालीवर भाजपवर टीकाही केली गेली