अक्कलकोट : आगामी निवडणुका सक्षमपणे लढवायच्या आहेत. प्रत्येक बुथ सक्षम झाला पाहिजे. बुथबरोबर कार्यकर्त्यांना सक्षम करून निवडणुकांना सामोरे जायचे आहे, त्याशिवाय यश मिळणे कठीण असल्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.
अक्कलकोट विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने समर्थ बुथ अभियान बैठक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी भाजपच्या वतीने ‘सशक्त बुथ, तर सशक्त भाजप’ आणि ‘सशक्त महाराष्ट्र, तर सशक्त भारत’ असा नारा देत अभियानात शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व बुथ प्रभारी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, महेश हिंडोळे, शशिकांत चव्हाण, सुरेखा होळीकट्टी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसेच जिल्हा परिषद गटनिहाय बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवानंद पाटील, शशिकांत चव्हाण, अण्णाराव बाराचारी, मोतीराम राठोड, प्रकाश घोडके, परमेश्वर यादवाड, अप्पासाहेब पाटील, अप्पू बिराजदार, सिद्धाराम हेले, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, अप्पू परमशेट्टी, शिवशरण भरम्मा, सुरेखा होळीकट्टी, दयानंद बमनळी, ऋषिकेश लोणारी, गुंडप्पा पोमाजी, राजकुमार बंदीछोडे, खयुम पीरजादे, चंद्रकांत इंगळे, दयानंद बिडवे, प्रभाकर मजगे, केदार विभुते, सुनील कळके, प्रदीप पाटील, श्रीशैल ठोंबरे, मधुकर चिवरे, रमेश क्षीरसागर, विवेकानंद उंबरजे, केदार विभुते, बसवराज बोळेगाव, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर चव्हाण, महादेव मुडवे, विशाल दारफळे, अशोक बिराजदार, मल्लिकार्जुन ढब्बे, रमेश रोडगे, अशोक वर्दे, अनिल बर्वे, लक्ष्मण पाटील, बसवंत कलशेट्टी, आनंद खजूरगीकर, शिवानंद चनशेट्टी, संजय भोसले, सोमनाथ पाटील, सुरेश त्रिगुळे, गिरमल गंगोडा, नागराज कुंभार, लक्ष्मीकांत धनशेट्टी, अंबण्णा चौगुले, निजप्पा गायकवाड, अंकुश चौगुले, आतिष पवार, पंडित कोरे, अप्पू कवटगीमठ, प्रदीप जगताप, शंकर उणदे उपस्थित होते.
---
फोटो : २२ अक्कलकोट १
अक्कलकोट येथे भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.