दक्षिण सोलापूर : तालुक्यात आचेगाव येथे गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेचे भूमिपूजन सद्गुरु बी. टी. गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी वंदे मातरम् जनसेवा संघटनेचे अध्यक्ष रविकुमार कुलकर्णी, गोशाळेचे कार्यवाह वीरेंद्र हिंगमिरे, भीमाशंकर मात्रे, बांधकाम समिती अध्यक्ष सुनील गुरव, चैतन्यकुमार शहा, विजय पाटील, रेवणसिद्ध हालोळी, गौरीशंकर वाले, विजय खंडाळी, उमाबाई बाबानगरे, गीता मणुरे, सुनील धरणे आदी मान्यवर उपस्थिती होते.
गोविंद वृद्धाश्रमात वस्त्रदान
टेंभुर्णी : माजी सहकार राज्यमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद आश्रमात महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने अनाथ महिलांना वस्त्रदान करण्यात आले. नातेपुते येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाच्या अध्यक्ष पद्मजादेवी मोहिते-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्या उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी जनसेवा संघटनेचे संचालक मल्लिकार्जुन वैद्य-देशमुख, राहुल लाळगे, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष धनंजय देशमुख, राजाभाऊ गुळवे, संतोष भिसे उपस्थित होते.
टेंभुर्णीत वृक्षारोपण
टेंभुर्णी : येथील स्वस्त धान्य पुरवठा विभागाच्या गोडाउन परिसरात पुणे विभागीय पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून वृक्षलागवडीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक ए. के. कोरबु, एस. आय. कुंतलकर, गुदामचालक अण्णासाहेब लांडगे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास भोसले उपस्थित होते. यावेळी ५५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमास टेंभुर्णी, बेंबळे, पिंपळनेर, आढेगाव, चांदज, शेवरेण परिसरातील रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विकास भोसले, आरडे, पिंटू कुटे, दादा ढवळे, बाबा मस्के, राहुल देशमुख, आबा ढवळे उपस्थित होते.
करमाळ्यात भाजपच्या वतीने वडाची रोपे वाटप
करमाळा : वटपौर्णिमेनिमित्त भाजपच्या वतीने करमाळा येथे महिलांना वडाची रोपे वाटप करण्यात आली. तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी सावित्री वटवृक्ष स्पर्धा जाहीर करण्यात आली. पुढील वर्षी या रोपांचे परीक्षण करून स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी महिला आघाच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, श्रीराम प्रतिष्ठानचे भीष्माचार्य चांदणे, गजराज चिवटे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, उपाध्यक्ष भय्या गोसावी, जयंत काळे-पाटील, प्रल्हाद कोकीळ, विश्वजित चिवटे, गणेश गाेसावी उपस्थित होते.