सोलापूर : कामातील हलगर्जीपणा आणि विनापरवाना गैरहजर राहणाºया जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत. यामध्ये एक कनिष्ठ सहायक आणि दोन परिचरांचा समावेश आहे.
मंगळवेढा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक जे. डी. काळे २७ मे २०१७ पासून विनापरवाना गैरहजर असल्याचा अहवाल गटविकास अधिकाºयांनी दिला होता. त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. पंढरपूर पंचायत समितीमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेले डी. एन. गंगणमले १५ मार्च २०१७ पासून विनापरवाना गैैरहजर आहेत.
गौडगाव (ता. बार्शी) प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर एन. आय. मुजावर २९ जानेवारी २०१७ पासून गैरहजर असल्याचा अहवाल गटविकास अधिकाºयांनी दिला होता. या आधारे गंगणमले आणि मुजावर यांना बडतर्फ करण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे कर्मचाºयांमध्ये खडबळ माजली असून कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.