सोलापूर : गेल्या २९ दिवसांपासून फरार असलेला नगरसेवक सुनील कामाठी... हैदराबादमधील बेगम बझार परिसरातील नातेवाईकाच्या घरी असल्याचा सुगावा लागताच पोलिसांचे एक पथक तेथे झाले दाखल... तेथील पानटपरी चालकाची मदत घेताना त्यानेही कामाठीवर पाळत ठेवली. एकीकडे त्याने पाळत ठेवली तर दुसरीकडे कामाठी हा पत्नीसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आंध्र आणि कर्नाटकातील अनेक गावात ठिकाणं बदलून रहायचा. अखेर बेगम बझारमधील सासरवाडीतून पत्नीसह त्याला ताब्यात घेतले. यासाठी तेलंगणा पोलीस दलातील कर्मचाºयाची मदत कामाला आली.
कोंची कोरवी गल्लीतील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये टाकण्यात आलेल्या धाडी नंतर फरार मटक्याचा मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनील कामठी हा फरार झाला होता. २४ आॅगस्ट रोजी झालेल्या कारवाईनंतर तो तब्बल २९ दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. सुनील कामाठी यांचा मोबाईल बंद असल्यामुळे व कोणीही व्यवस्थित माहिती देत असल्यामुळे तो नेमका कुठे आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. तो कर्नाटकातील गुलबर्गा, रायचूर आंध्र प्रदेशातील विजयवाडा, मछलीपट्टनम या भागांमध्ये सतत ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस प्रत्येक वेळेस त्या त्या ठिकाणी जाऊन कामाठी याचा शोध घेत होते. मात्र, तो मिळून येत नव्हता. नंतर तो हैदराबाद येथील बेगम बाजार परिसरात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. तेथेही पोलिसांनी यापूर्वी पाच वेळा जाऊन शोध घेतला मात्र त्यांना कामाठी मिळून येत नव्हता.
तेलंगणाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेल्या टिप्सनुसार एका पान टपरी चालकास कामाठीवर पाळत ठेवण्याचे सांगण्यातआले. पान खाण्याची सवय असलेला नगरसेवक सुनील कामाटी हा नेमका त्याच पान दुकान तालुका कडे येत होता. फोटो दाखवल्यानंतर त्याने हा व्यक्ती पान खाण्यासाठी येत असल्याचे सांगितले, मात्र तो कोठे राहतो याची माहिती पान दुकान चालकाला नव्हती. पान दुकान चालकाने एक दोन वेळा नगरसेवक सुनील कामाटी याला ‘साब, आप कहा रहते हो...’ असेही विचारले होते मात्र त्याने पत्ता सांगितला नव्हता. शेवटी पान दुकान चालकाने सुनील कामाठी रहात असलेल्या घराचा पत्ता शोधून काढला आणि त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस मंगळवारी दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी हैदराबाद कडे रवाना झाले. शहानिशा करत बुधवार दि. २३ सप्टेंबरच्या पहाटे सुनील कामाटी राहात असलेल्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी सुनील कामाठी व त्याची पत्नी सुनीता कामाठी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि तेथून सोलापूरला आणले. कामाठी वापरत होता शिवसेनेचा झेंडा असलेली कार नगरसेवक सुनील कामाटी हा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे मात्र तो कोणाला शंका येऊ नये म्हणून हैदराबाद मध्ये शिवसेनेचे नाव व झेंडा असलेली कार (क्र. एमएच-०९/बीजे- ९७९७) घेऊन फिरत होता. कारसह मालक प्रवीण भीमाशंकर गुजले व मटका व्यवसायात मदत करणाºया हुसेन उर्फ रफिक नूरअहमद तोनशाळा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
काका नसला की काकी पैसे द्यायची...मटका प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये माहिती घेतली असता, पुतण्या आकाश कामाटी याने पैशाचा देण्याघेण्याचा व्यवहार काका नसला की काकी करायची. अशी माहिती पोलिसांना दिली होती, यावरून सुनिता कामाटी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते मात्र दुसºया दिवशी त्याही सोलापूरतुन गायब झाल्या. याप्रकरणी सुनिता कामाठी यांनीही अटक झाली असून त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
अटकपूर्वचा प्रयत्न असताना झाली अटकनगरसेवक सुनील कामाठी हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्याच्या तयारी मध्ये होता. वकिलामार्फत बुधवारी अटक पूर्व जामीन घेण्यासाठी अर्ज ठेवला होता, मात्र पोलिसांनी त्याला पहाटेच ताब्यात घेऊन थेट पोलीस कोठडी मागून घेतली.
यांनी केलेली कामगिरी...नगरसेवक सुनील कामाठी याला पकडण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप शिंदे, फौजदार शैलेश खेडकर, फौजदार अजित कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, गणेश शिंदे, सागर मोहिते, सुहास अर्जुन, संतोष वायदंडे, महिला कॉन्स्टेबल आयेशा फुलारी, चालक पोलीस नाईक सांगळे, काटे, संतोष येळे, आय्याज बागलकोटे आदींनी पार पाडली.