आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने सोलापूरात महाराष्ट्र कन्नड साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे़ दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यीक डॉ़ बी़बी़ पुजारी हे राहणार असून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे़ सोलापूरात प्रथमच कन्नड सारस्वातांची मांदीयाळी भरणार आहे़ पन्नास वर्षापूर्वी सोलापूरात अखिल भारतील कन्नड साहित्य संमेलन झाले होते, या नंतर महाराष्ट्र पातळीवरील हे साहित्य संमेलन राहणार आहे़कन्नड साहित्य परिषदेच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील कन्नड साहित्य सेवकांसाठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे़ येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला़ साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष बसवराज मसूती यांनी प्रास्ताविकात साहित्य संमेलन घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली़ बैठकीचे सूत्रसंचालन शिवानंद गोगाव यांनी केले़ सुनिल सवळी यांनी आभार मानले़ हे साहित्य संमेलन सर्वच अर्थाने संस्मरणीय करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला़ कन्नड अध्ययन संस्थेचे अध्यक्ष डॉग़ुरूलिंगप्पा धबाले, माजी नगरसेवक बसवराज रमणशेट्टी, प्रा़ बसवराज कापसे, महाराष्ट्र वीरशैव सभा युवा आघाडीचे अध्यक्ष राज पाटील, सुरेखा होळीकट्टी, कन्नड वाचनालय चळवळीचे डी़बी़हेब्बाळ, शिवानंद तडवळ, बसवराज अचलद, प्रा़शिवराज पाटील,बी़एस़ कापसे यांच्यासह जिल्ह्यातील कन्नड चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते़ या साहित्य संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येत असून कन्नड साहित्यावर प्रेम असणाऱ्या वाचक व नागरीकांनी पुढे येण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे़
महाराष्ट्र कन्नड साहित्य परिषदेच्या वतीने सोलापूरात कन्नड साहित्य संमेलन
By admin | Published: May 06, 2017 9:28 PM