शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ढोलीबाजा लावला, गुलाब हार घातले; दोन किमी वरात काढून केले स्वागत

By काशिनाथ वाघमारे | Published: March 13, 2023 2:55 PM

कन्याकुमारी सायकलवारी : प्रवासातला अनुभव केला कथन

सोलापूर : कन्याकुमारी सायकलवारी करणा-या दोन वृद्धांचे रविवारी सायंकाळी सोलापुरात २६ दिवसानंतर आगमन झाले. नीलमनगर वासियांनी गुलाब हार घालून बँजो लावून विठ्ठल कदम आणि श्रीशैल नवले या दोघांचे वाजत गाजत स्वागत केले. तसेच दोन किलो मीटर मिरवणूक काढली. 

२६ दिवसांपूर्वी या दोघांनी सायकलवर कन्याकुमारी प्रवास सुरू केला होता. त्यांनी  दररोज ताशी दहा किलो मीटर अंतर सायकलवर कापून दिवसभरात दहा तास प्रवास करायचे. सायंकाळी मंदिर वा लॉजवर उतरून मुक्काम करायचे. सोबत सायकलीस हवा मारण्यासाठी पंप आणि थकलेल्या पायांना चोळण्यासाठी तेल वापरायचे. एवढ्याशा तयारीवर त्यांनी २६ दिवसात २६०० किलो मीटर अंतर पार करुन कन्याकुमारीत स्वामी विवेकानंदांचे साहित्य जाणून घेतले.  

 दहा दिवसांपूर्वी ते कन्याकुमारीतून परत निघाले. शनिवारी विजयपुरात पोहोचले. रविवारी सायंकाळी सोलापुरात विजारपूर रोडवर सैफूल परिसरात त्यांचे आगमन झाले. येथून ठिकठिकाणी नातेवाईक थांबवून स्वागत केले. घरापर्यंत येईपर्यंत सहा किलो मीटर अंतरावर अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करुन प्रवासाबाबत विचारपूस केली.नवले यांना भेटण्यासाठी त्यांच्या दोन बहिणी सांगली आणि धाराशिव येथून आल्या होत्या. त्यांनी औक्षण केले.मंदिरापासून खांद्यावर आणले घरी नीलम नगर परिसरात येताच नगर वासियांनी ढोली बाजा लावून स्वागत केले. जवळपास दोन किलो मीटर वाजत गाजत नेले. या परिसरात निंब्यव्वा देवीचे दर्शन घेतले. साठी पार केलेल्या विठ्ल कदम आणि श्रीशैल नवले यांना काही तरुणांनी खांद्यावर घेऊन जल्लोष करीत घरापर्यंत नेले.