करकंब पोलीस ठाण्याचे सपोनि नीलेश तारू व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी अवैद्य हातभट्टी व्यवसायाबाबत तपासणी केली. परंतु काही मिळून आले नाही. यावेळी त्यांच्या नवीन व्यवसायाबाबत माहिती घेतली. त्यांचे मन परिवर्तन करून शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सपोनि निलेश तारू यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, पोह. आर.आर. जाधव, पोना. सज्जन भोसले, पोना. दयानंद हजारे, पोह. अजिनाथ रानगट, पोना. संतोष पाटेकर, मपोना. सिंधू पवार, पोना. गिरमकर यांनी सहभाग नोंदविला.
शिक्षण व व्यवसायाकडे लक्ष द्यावे
करकंबमधील अवैध व्यावसायिकाची भेट घेऊन काहीतरी नवीन उद्योगधंदा, व्यवसाय, शेतीसह व कुटुंबाला पूरक असणारे व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी लक्ष द्यावे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी सांगितले.
फोटो ओळ :::::::::::::::::::
करकंब येथील एका कुटुंबाला शिक्षण व व्यवसायाबाबत मार्गदर्शन करताना सपोनि नीलेश तारू, पोउनि महेश मुंढे आदी.