सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली़ करमाळा, माळशिरस आणि फलटण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सर्वाधिक चुरस पहायला मिळत आहे़ करमाळा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत २०.६८, माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०.४२ तर फलटण विधानसभा मतदारसंघात २०.६६ टक्के मतदान झाले.
माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १९.६४ टक्के मतदान झाले़ बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी मोठया रांगा लावत मतदानाची प्रक्रिया पार पाडली़ यंदाच्या लोकसभा मतदारसंघासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.८१ टक्के, सांगोला १८.३५ तर माण विधानसभा मतदारसंघात १७.९० टक्के मतदान झाले़ आतापर्यंत २ लाख ४१ हजार २६९ पुरूष तर १ लाख ३५ हजार ८१९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.