प्रभू पुजारीपंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत कार्तिकी यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत़ हे चित्र पाहून ‘दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़’ या भक्तिगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही़कार्तिकी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन हा भक्तांचा मेळा पायी प्रवास करीत पंढरीकडे मंगळवेढा, सांगोला, पुणे, सातारा, करकंब, मोहोळ, कराड या मार्गाने येत असल्याचे दिसून येत आहे़ मंगळवेढा मार्गावरून कर्नाटकातील अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने येत असल्यामुळे हा रस्ता विठ्ठल भक्तांनी फुलला आहे़ कन्नड भाविक ‘कानडा विठ्ठलू’ च्या दर्शनासाठी येत आहेत़ या मार्गावर सगळीकडे भक्तीचा गजर सुरू आहे़ यंदा सर्वत्र पाऊस झाल्यामुळे पंढरीकडे येणाºया भाविकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ मंगळवेढा रस्त्यावर ठिकठिकाणी झाडाखाली विसावा घेऊन भाविक भोजन घेताना दिसून येत आहेत़ शिवाय काही ठिकाणी समाजसेवी संस्थेच्या वतीने या भाविकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची सोय केली आहे़ पुणे, करकंब, मोहोळ मार्गावरून एकामागून एक दिंड्या येत असल्याचे चित्र आहे़ परिणामी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होऊन जिकडे तिकडे ‘माऊली़़़ माऊली़़़’ हा शब्द कानी पडत आहे़ भाविक जरी पायी चालत येत असले तरी त्यांना कार्तिक वारी संपेपर्यंत लागणाºया सरपणासह (जळण) सर्व साहित्य सजविलेल्या ट्रक, ट्रॅक्टरमध्ये ठेवले होते़ त्यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी या वाहनांची गर्दी दिसून येत होती़ ---------------------जनावरांच्या वाहनांची गर्दीकार्तिकी यात्रेला पंढरपुरात जनावरांचा मोठा बाजार भरतो़ लाखोंच्या संख्येने जनावरे या वारीला येतात़ त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ मंगळवारी कार्तिकी वारी असली तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंढरीकडे येणाºया सर्व मार्गावर खोंड, गाय, बैल, म्हशी, रेडा ही जनावरे टेम्पो, पिकअप, ट्रक, छोटा हत्ती या वाहनांमधून घेऊन पशुपालक येत आहेत़ शिवाय सोबत जनावरांना चार ते पाच दिवस पुरेल इतका चाराही वाहनाच्या टपावर बांधून ही वाहने पंढरीच्या दिशेने येत आहेत़ पूर्वी जनावरांचा बाजार समितीच्या आवारात भरत होता, परंतु गतवर्षीपासून हा बाजार वाखरी येथे हलविण्यात आला आहे़ त्यामुळे वाखरीकडे जाणाºया रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे़
कार्तिकी यात्रा सोहळा !! दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़दिंड्या आल्या पंढरपूर समीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:26 AM
डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत कार्तिकी यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत़ हे चित्र पाहून ‘दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़’ या भक्तिगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही़
ठळक मुद्देसावळ्या पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन हा भक्तांचा मेळा पायी प्रवास करीत पंढरीकडे कार्तिकी यात्रेला पंढरपुरात जनावरांचा मोठा बाजार भरतो़समाजसेवी संस्थेच्या वतीने या भाविकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची सोय