यामध्ये कासेगाव व कासेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, वय ४५ ते ५९ मधील व्याधीग्रस्त नागरिक व शिक्षक यांनी लसीकरण केले.
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ॲन्टीजेन रॅपिड टेस्ट, लसीकरणाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील, डॉ. शुभांगी गुंजाळ, तनपुरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत कुलकर्णी, औषध निर्माण अधिकारी विजय सक्री, एस. पी. जाधव, बी. डी. माने, शिरीष पाटील, दीपक चव्हाण, सुनील माने, प्रसाद जवंजाळ, योजना भोसले, कमल मोरे, एस. जी. राठोड यांच्यासह आरोग्य सेवक व सेविका,अशा सेविकांनी परिश्रम घेतले. झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, पं.स. माजी सभापती प्रशांत देशमुख यांनी कौतुक केले.